यशवंतराव चव्हाण यांचे 1984 मध्ये निधन झाले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. विटा हे यशवंतराव चव्हाण यांचे मुळगाव असून त्यांनी या शहराच्या विकासासाठी पदोपदी मदत केली. त्यांच्या नावाने विटा शहराचे पहिले उपनगर म्हणून यशवंतनगर वसवण्यात आले. तसेच त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्या नावाने बळवंत महाविद्यालय सुरू करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांचे उच्च स्मारक झाले पाहिजे अशी भावना यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची होती त्यावेळचे नगराध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी नगरपालिका व लोकसहभागातून यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. या पुतळ्यासाठी शिल्पकार म्हणून बी आर खेडकर यांची निवड करण्यात आली.
1990 मध्ये पुतळ्याचे काम पूर्ण झाले. शहरातील लेंगरे आणि साळशिंगे मार्गाच्या मध्यभागी पुतळ्यासाठी चबुतरा व त्यास पुढे उभा करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. 17 जून 1990 रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण समारंभ झाला.