logo

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तत्कालीन सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार निर्माण केले. खानापूर तासगाव वाळवा हे तालुके प्रति सरकारची प्रभावक्षेत्र होती. खानापूर तालुक्यातील अनेक गावांशी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा घनिष्ठ संबंध आलेला होता. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे अनेक सहकारी व अनुयायी यांची विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून उचित स्मारक करावे अशी भावना होती. बाळकृष्णट मोहिते अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन करण्यात आली. या समितीत माजी आमदार हणमंतराव पाटील होते.

पुतळ्यासाठी शिल्पकार संजय कुमार पिंपरी पुणे तर आर्किटेक्ट म्हणून एमआर यादव कोल्हापूर यांची नियुक्ती करण्यात आली. कराड रोड मार्गालगत सेंटर स्कूलच्या चौकात क्रांतिसिंह नाना पाटील समितीच्या वतीने क्रांतिसिंह यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा पुतळा उभा केला. त्यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली व चबुतरा उभाकरून योगदान दिले. 28 जानेवारी 1996 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी एम देशमुख यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याचे अनावरण समारंभ झाला.