logo

विटा येथील ऐतिहासिक बुरुज

विटा येथे त्र्यंबकराव यांनी स्वतःकरिता भव्य वाडा बांधला. बुरुज असलेला ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा जुना वाडा त्र्यंबकराव यांनी बांधला होता. त्याला चार बुरूज होते. 1848 मध्ये इंग्रजांनी सातारचे राज्य म्हणजेच मराठ्यांचे राज्य खालसा केले आणि इंग्रजांचे राज्य सुरू झाले. अशा रीतीने 1848 मध्ये वाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सातारा जिल्ह्यातील सर्व रजिस्टर कचेऱ्यातील निरंतर चे जुने रेकॉर्ड संरक्षणासाठी या वाड्यात ठेवण्यात आले. जुन्या नगरपालिकेची इमारत एक बुरुज पाडून बांधली दुसरा बुरुज पाडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. तिसरा बुरुज पाडून अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्याचे काम चालू आहे. चौथ्या बुरुजाचे अवशेष विनोद कॅफे हॉटेल च्या पाठीमागे आहेत या वाड्यात मोठी विहीर होती विटा मर्चंट बँकेच्या इमारतीखाली आजही ती विहीर आहे.