नवनाथ संप्रदायाची सुरुवात आठव्या-नवव्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी केला. नाथ संप्रदायात चमसनारायणाचा अवतार म्हणून रेवनाथाचा उल्लेख आहे. नवनाथ कथासार ग्रंथात रेवानाथांनी विटा येथील सरस्वती ब्राम्हनांची मुले जिवंत केल्याचा उल्लेख आहे. रेवनसिद्धांची विटा येथे रेणावी, मूळस्थान, देवनगर, माहुली येथे मंदिरे आहेत.
रेवणगावाचे नाव रेवनाथावरून पडले आहे. तेथेही रेवणसिद्ध मंदिर आहे. यावरून नवनाथांच्या काळात म्हणजे आठव्या नवव्या शतकापासून रेवणसिद्ध मंदिर येथील शिलालेख नवनाथांनी या परिसरात वास्तव्य, भ्रमण केल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते.