logo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराज पुतळा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराज पुतळा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विटा येथे स्मारक व्हावे अशी लोकभावना होती. लोकसहभाग व नगरपालिकेच्या सहकार्याने पुतळा उभा करण्याचे ठरले. 2009 मध्ये आमदार सदाशिवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन केली. या पुतळ्यासाठी शिल्पकार म्हणून चंद्रदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आली.

22 ऑगस्ट 2009 रोजी त्यावेळचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समोरासमोर पुतळा असलेले विटा हे एकमेव शहर आहे.