logo

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

1974 मध्ये विटा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत नगरपालिकेने निर्णय घेतला. विटा कराड व विटा तासगाव रस्त्याच्या कोपऱ्यावर एक बुरूज होता. त्या बुरुजाच्या मातीचा वरचा भाग काढून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे ठरले आणि भूमिपूजन देखील झाले. परंतु पुतळा बसण्याचे काम प्रलंबित राहिले. 1974 मध्ये नगरपालिका सत्तांतर होऊन हणमंतराव पाटील नगराध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी आत्माराम बापू शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती तयार केली. या समितीने पुण्याच्या बी आर खेडकर यांची शिल्पकार म्हणून नियुक्ती केली.

साधारण 1984 मध्ये पुतळ्याचे काम पूर्ण झाले. 11 मे 1987 रोजी त्यावेळचे राजस्थानचे राज्यपाल पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या तोडीचा पुतळा संपूर्ण राज्यात अपवादानेच बघायला मिळेल.