logo

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीरांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगुंडा पाटील असे होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे. यांचे बालपण कुंभोज येथे गेले. प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विट्यासह अन्य काही गावांमध्ये झाले. विटा येथे दत्तोपंत जोशी यांनी चालविलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात त्यांचे पहिलीचे शिक्षण झाले. विट्यात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना कोल्हापूरला जावे लागले. भाऊराव हे समाज सुधारक व शिक्षण प्रसारक होते.

सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची तारीख खुली करण्यासाठी तसेच बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी कराड जवळील काले, जिल्हा सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे रयत शिक्षण संस्थेचे धोरण होते. विटा येथे गरिबांना मोफत शिक्षण मिळत नव्हते म्हणून कर्मवीरांनी येथे विटा हायस्कूल सुरू करण्याचे ठरविले. 15 मार्च 1951 रोजी विटा हायस्कूल विटा ची स्थापना करण्यात आली.