logo

गलाई व्यवसाय

गलाई व्यवसाय

काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या कोणत्याही सराफा बाजारात सोने हा जसा एक अविभाज्य भाग असतो, तसाच या सर्व ठिकाणी आणखी एक सामायिक घटक असतो तो म्हणजे तेथे असणारे विटा खानापूर परिसरातील गलाई बांधव. परप्रांतातील सराफ हा बाजारात मराठी माणूस असणे आश्चर्याची बाब आहे. परप्रांतात जायचे, तेथे केवळ आणि केवळ विश्वासावर अवलंबून असलेल्या सोने चांदी व्यवसायात काम करायचे हे तसे आव्हानात्मकच, पण दुष्काळी परिस्थितीला मात देत विटा-खानापूर, आटपाडी परिसरातील गलाई व्यवसायात घट्ट मुळे रोवली. आटणी आणि टंच काढण्याबरोबरच ज्वेलर्स खरेदी-विक्री व्यापार, दागिने निर्मिती कारखाने, हॉलमार्किंग सेंटर अशा सोने-चांदीची निगडित व्यवसायात व्यापक विस्तार केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातील सराफा बाजारात विटेकऱ्यांचा ठसा पाहायला मिळतो. खडतर आव्हाने आणि अडचणींवर मात करीत गलाई बांधवांनी या व्यवसायात यश मिळविले आहे. देशभरात सराफा बाजारात फिरताना इसराल गावरान मराठीत एखादी खणखणीत हाक ऐकू आली, तर समजावे की हा माणूस विटा खानापूर परिसरातील आहे. सुरुवातीला या लोकांनी सोनं गलाई आणि आठणीचं काम केलं. त्याच्या जोडीने सोन्याचा टंच काढणे आणि सोने शुद्ध करून देणे, हा व्यवसाय देखील सुरू केला.

. देशाच्या कानाकोपऱ्यातील सराफा बाजारात विटेकऱ्यांचा ठसा पाहायला मिळतो. खडतर आव्हाने आणि अडचणींवर मात करीत गलाई बांधवांनी या व्यवसायात यश मिळविले आहे. देशभरात सराफा बाजारात फिरताना इसराल गावरान मराठीत एखादी खणखणीत हाक ऐकू आली, तर समजावे की हा माणूस विटा खानापूर परिसरातील आहे. सुरुवातीला या लोकांनी सोनं गलाई आणि आठणीचं काम केलं. त्याच्या जोडीने सोन्याचा टंच काढणे आणि सोने शुद्ध करून देणे, हा व्यवसाय देखील सुरू केला.