logo

रामचंद्र धोंडीबा भंडारे

रामचंद्र धोंडीबा भंडारे यांचा जन्म विटा येथे 11 एप्रिल 1916 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. 1942 पासून त्यांनी मुंबई मध्ये कामगार चळवळीत सहभाग घेतला 1986 मध्ये त्यांनी वरळी मध्ये वाचनालय सुरू केले. दरम्यान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत चळवळीमध्ये कार्यरत झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे ते सदस्य होते. 1967 ते 1971 मध्ये मुंबईमध्ये मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवारीवर लोकसभेवर निवडून गेले.

1973 ते 1976 बिहार व 1976 ते 1977 या काळात आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले विटा शहराशी त्यांचा अखेरपर्यंत घनिष्ठ संबंध होता. विटा पालिकेच्या शॉपिंग सेंटरचे व विटा नगर वाचनालयाच्या इमारतीचे उद्घाटन 9 ऑक्टोंबर 1973 रोजी त्यांच्या हस्ते झाले. असे हे विटेचे थोर सुपुत्र रामचंद्र धोंडीबा तथा आर डी भंडारे 5 सप्टेंबर 1988 रोजी बुद्धवासी झाले.