विटा नगारपरिषद 24/7 आपल्या सेवेत उपलब्ध (18002332382)
महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्यातील विटा हे प्रमुख शहर आहे. सदर शहराची लोकसंख्या ४८,२८९ इतकी आहे . विटा शहर हे सांगली जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी उत्तरेस आहे. सातारा शहराच्या आग्नेयेस सुमारे ७५ किमी अंतरावर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या नगराला महत्त्व आहे. छत्रपतींच्या प्रतिनिधीचे वास्तव्य येथे होते. त्र्यंबक कृष्ण यांनी एक वाडा येथे बांधला.
विटा नगरपरिषद ही - ब वर्ग नगरपरिषद असून स्वंच्छO सर्वेक्षण 2021 मध्येळ संपूर्ण देशात 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येरच्याF गटामध्येग सर्वांत स्वंच्छO शहर म्हाणून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले आहे. तसेच स्वंच्छय सर्वेक्षण 2021 मध्येव 3 स्टा्र म्हनणून तारांकित मानांकन व ODF+ + हागणदारीमुक्त शहर मानांकन प्राप्त् झाले आहे. या पारितोषिकाचे वितरण 23 नोव्हेंनबर 2021 रोजी भारताचे महामहिम राष्ट्रवपती मा.श्री.रामनाथ कोवींदजी यांचे हस्ते विज्ञान भवन, दिल्लीा या ठिकाणी करणेत आले.
विटा खानापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथले ऐतिहासिक संदर्भ थेट रामायण काळापर्यंत पोहोचतात.
इंग्लंडच्या धरतीवर भारतात नगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरपालिकांचा 1850 चा अॅक्ट 26 मंजूर करण्यात आला.
विटा शहर 3 लहान ओढ्यांच्या संगमावर वसलेले आहे.1917 मध्ये विटा नगरपालिकेने पिण्याचे पाण्यासाठी विहीर खोदली.
विटा शहरात खूप वर्षापासून वास्तव्यास असणारे कोष्टी समाजाचे लोक त्यांचा पारंपारिक विणकामाचा व्यवसाय करीत होते.
1913 मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. कालांतराने त्या शाळेला कन्या शाळा क्रमांक 3 असे नाव देण्यात आले. शाळा नंबर 1 मध्ये मुलांच्या संख्येत चांगली वाढ झाल्यामुळे शाळा नंबर २ अशी स्वतंत्र शाळा १९४४ पासून सुरु करण्यात आली. . मुस्लिम समाजाला मातृभाषेतून शिक्षण मिळवण्यासाठी 1930 मध्ये उर्दू शाळा स्थापन करण्यात आली. आजरोजी नगरपरिषदेच्या एकूण 19 शाळा सुरु आहेत.
विटा आणि खानापूर परिसरात टप्प्याटप्प्याने वैद्यकीय सेवा विकसित होत गेली. सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली. नंतर नगरपालिकेच्या सहाय्याने वैद्यकीय सुविधा सुरू झाल्या. शासकीय आरोग्य सेवा लोकल बोर्ड व नंतर जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाले.
विटा शहरातील विविध शासकीय कार्यालये नागरिकांच्या सोईकरिता व प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून एकाच इमारतीत आणून एक सुसज्ज अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत खालीलप्रमाणे कार्यालये आहेत
विटा शहरातील मध्यवर्ती भागात प्रशासकीय इमारती शेजारी विटा पोलीस ठाणेची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीच्या आवारात पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना राहाणेसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
नवनाथ संप्रदायाची सुरुवात आठव्या-नवव्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी केला. नाथ संप्रदायात चमसनारायणाचा अवतार म्हणून रेवनाथाचा उल्लेख आहे.
विटा नगारपरिषद आपले काम उत्तमरीत्या करत असल्याने नागरिकांना अनेक सोयींचा फायदा होत आहे.
विटा नगारपरिषद महिलांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत.त्यामुळे महिलांना आपले आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत आहे.
विटा नगारपरिषद आपले काम उत्तमरीत्या करत आहे.
विटा नगारपरिषद महिलांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत.त्यामुळे महिलांना आपले आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत आहे.
विटा नगारपरिषद आपले काम उत्तमरीत्या करत आहे. अनेक जागरुकीजनक उपक्रम राबवले जात आहेत.